क्राईम

भयंकर! महिलेवर सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात रॉड घुसवला, महिलेची रुग्णालयात मृत्यूशी झुंज

उत्तर प्रदेश : एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दिल्लीतील एका ३८ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार करून अत्याचार केले. सध्या ही महिला दिल्लीतील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ती रस्त्यावर एका पोत्यात हातपाय बांधलेल्या स्थितीत सापडली होती. पीडित महिला आपल्या भावाचा वाढदिवस साजरा करून गाझियाबादहून परतत होती. ती बसची वाट पाहत असताना एक स्कॉर्पिओ गाडी त्या महिलेजवळ आली आणि पाच जणांनी तिला गाडीत ओढले. आरोपींनी तिला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

याबाबत माहिती देताना एसपी सिटी (गाझियाबाद) म्हणाले कि, “18 ऑक्टोबर रोजी नंदग्राम (यूपी) पोलिसांना माहिती मिळाली की आश्रम रोडजवळ एक महिला पडली आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. ती दिल्लीची रहिवासी असून नंदग्राम येथील तिच्या भावाच्या घरी आली होती. तिच्या भावाने तिला तिथे सोडल्यानंतर तिच्या ओळखीच्या 5 लोकांनी तिला पळवून नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आत्तापर्यंत या प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली असून एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यात मालमत्तेचा वाद असल्याचे बोलले जात आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की आम्ही सर्व आवश्यक कारवाई करत आहोत.

ट्विटरवर DCW चेअरपर्सन स्वाती मालीवाल यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि गाझियाबाद पोलिसांना नोटीस बजावल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला होता. ती रस्त्यावर सापडली तेव्हा रॉड तिच्या आतच होता. शिवाय, हे प्रकरण अगदी निर्भयासारखे आहे… किमान हे प्रकरण जलदगतीने चालवावे आणि या लोकांना कठोर शिक्षा द्यावी असे माझे आवाहन आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

15 तास ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago