कोरोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध देण्यात येत होतं. मात्र जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) कोरोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर हे औषध यादीतून बाद केलं आहे. हे औषध कोरोना बरं होण्यासाठी गुणकारी असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं WHO ने म्हटलं आहे. ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला हा सल्ला अनेकांना चुकीचा वाटू शकतो कारण अनेक देशांमध्ये वैज्ञानिकांनी कोरोनावर रेमेडिसविर हे औषध लागू पडतं आहे असं म्हटलं आहे. मात्र WHO ने औषध यादीतून बाद केलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, WHO चे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी एका इमेलला पाठवलेल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, “होय आम्ही रेमेडिसविर हे औषध PQ प्रीक्वालिफिकेशन लिस्टमधून बाद केलं आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी एकाही देशाने हे औषध खरेदी करु नये.”
आशियाई देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते तेव्हा दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आशियाई देशांनी तयार रहावं असंही WHO ने म्हटलं आहे.