corona virus
कोरोना

कोरोनाचं रौद्र रुप ; अवघ्या 30 सेकंदासाठी जरी संपर्क आला तरी देखील विषाणूचा बळी ठरणार; 15 वर्षांखालील मुलांसाठी धोकादायक;

मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचं रौद्र रुप समोर येत आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम देशातील लहान मुलांवर झाल्याचं पाहायला मिळतं. देशात अद्याप कोरोनाच्या नवीन स्वरूपाची पुष्टी झालेली नाही. परंतु कोरोनाचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये समोर आला हे नाकारता येणार नाही. यामुळे भारतासह इतर देशांनाही याचा धोका आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, याचा सर्वात मोठा धोका देशातील 15 वर्षांखालील मुलांना आहे. याऊनही भयकंर म्हणजे लहान मुलांसाठी अद्याप कोरोनाची लस आलेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सध्याची लस 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांवर चाचण्याद्वारे तयार केली गेली आहे. अशा परिस्थितीत जर मुलांना वेगाने संसर्ग होऊ लागला तर काय होईल? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण, हा नवीन प्रकारचा विषाणू 70 टक्के वेगाने पसरतो. जर कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात पाच मिनिटं जरी राहिलात तरी एखाद्याला संसर्ग होऊ शकतो. पण जर एखाद्याने नवीन विषाणूच्या संक्रमित व्यक्तीशी अवघ्या 30 सेकंदासाठी जरी संपर्क साधला तर तो देखील विषाणूचा बळी ठरू शकतो.

आतापर्यंत, विषाणूच्या रुपामधला हा नवा अवतार 70 टक्के अधिक धोकादायक आहे. त्यातूनच मुलांमध्ये हा वेगाने पसरू शकतो. असा दावाच यूके सरकारच्या न्यू एंड इमर्जिंग रेस्पिरेटरी व्हायरस थ्रेट्स एडवायजरी समुहाने दिला आहे. यूकेच्या ज्या भागात व्हायरसचे नवीन प्रकार आढळले आहेत अशा ठिकाणी 15 वर्षाखालील मुलांची संख्या अधिक आहे.

कोरोनाच्या या नव्या रुपाने स्वत:मध्ये धोकादायक बदल केला आहे. आता त्याने पेशींना वेगळ्या प्रकारे संक्रमित करण्यास सुरवात केली आहे. तो किती धोकादायक आहे आणि याचा शरीरावर काय परिणाम होतो याचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत